0712-2422759,2454193  |   dhanwatenationalcollege@yahoo.com

  |   Login   |   Contact

Shri Shivaji Education Society,Amravati's

DHANWATE NATIONAL COLLEGE

Congress Nagar Nagpur-440012 (MH)
Affiliated to Rashtrasant Tukodoji Maharaj Nagpur University, Nagpur
(NAAC Re-Accredited ‘B+’ Grade, CGPA 2.53)
College With Potential For Excellence status by UGC ,New Delhi Recognized Centre For Higher Learning and Research Institutional Member of Asia Pacific Quality Network,Shanghai Career Katta as a Centre of Excellence
CSS MenuMaker

Seminar Workshop Organised


1) National Seminar on Rashtrasant Tukadoji Maharaj’s Literature & Relevance in Collaboration with Rashtrasant Tukadoji Maharaj Chair, RTMNU, Nagpur on 4th October, 2017

2) Marathi Bhasha Din in Collaboration with RTMNU, Nagpur on 7th March 2017


3) Shabdarang Mahila Sahitya Sammelan 2019 in Collaboration with Amhi Lekhika, Nagpur on 10th October, 2019

4) Nakshatra Prabha Kavya Sangrah Prakashan & Kavi Sammelan in collaboration with Maaymarathi Nakshatra Samuh, Nagpur on dated 1st March, 2020

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा (१३ जानेवारी, २०२०)
Marathi Language Promotion Fortnight
Date Programme
17/01/2017 Reading competition & poetry Reading
14/01/2018 Reading & Writing competition
17/01/2019 Granth dindi & Bhasha din programme
13/01/2020 • Granth dindi
• Guest Lecture
• One Act Play & Kirtan




मराठी भाषा गौरव दिन २७ जुलै २०२०

मराठी भाषा गौरव दिन निमित्त आयोजित ऑनलाईन व्याख्यान माला

दि ९ मार्च, २०२१
विषय : मराठी साहित्य आणि कथा.
व्याख्यात्या सुप्रसिद्ध लेखिका विजया ब्राह्मणकर

दि १० मार्च, २०२१
विषय : 'स्त्री सुरक्षा आणि उपाय' .
व्याख्यात्या सुप्रसिद्ध लेखिका प्रा. विजया मारोतकर

६ मे २०२२
जेष्ठ साहित्यिक प्रा. श्रीपाल सबनीस, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन देशमुख, कार्यकारिणी सदस्य श्री हेमंतजी काळमेघ, मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या प्रा. विजयाताई मारोतकर


2022-23

Mono Acting Competition (अभिनय स्पर्धा)

10th October, 2023 at 10.30 am


Intercollegiate Poetry Reading Competition (कवी संमेलन)

17/11/2022


ग्रंथ प्रकाशन "झेप एका ताऱ्याची" व रिमोट सेन्सिंग कार्यशाळा by Dr. Tarendra Lakhankar, Senior Scientist, City University, New York (USA).

28/12/2022


महिला सुरक्षा आणि उपाय

14/01/2023

Prabhavati Ekurkey, Police Inspector, Dhantoli Police station guided the students about the importance of women safety.

Mr. Atul Agarkar, Police Head-constable, Nagpur City Police also guided during the program. He explored various remedies for women safety.


व्याकरण व निवेदनशैली कार्यशाळा (Grammar and Public Speaking Workshop)

21/01/2023

The Department of Marathi had organized workshop on “Grammar and Public Speaking” (व्याकरण व निवेदनशैली कार्यशाळा) on 21st January, 2023 at Vimlatai Deshumukh Sabhagruh.
The workshop was inaugurated by Dr. Pankaj Chande, Ex. Vice President, Kavi Kulguru Kalidas Sanskrit Vidyapeeth, Ramtek. Dr. Chande expressed his views during the program. He told that; this type of workshop facilitate to train budding writer and help in new creations.
Dr. Balwant Bhoyar, well-known writer was the chief guest of the program.
Dr. Jaywant Wadte, Principal, Dhanwate National College had presided over the program.
Dr. Bharti Khapekar, Vice Principal, Professor & Head, Department of Marathi had organized the program.
The entire workshop is divided into FOUR sessions.
Session-1 : Dr. Komal Thakre, Well-known narrator, Taywade College, Koradi had guided students on ‘Communication style and personality development’ ( निवेदन शैली आणि व्यक्तिमत्व विकास).
Session-2 : Dr. Vishakha Kamble, Well-known writer, Nagpur had guided students on ‘Importance of dialect’ (बोली भाषेचे महत्व)
Session-3 : Dr. Rashtrapal Meshram, Head Department of Marathi, Social Work College, Kamptee, Dist. Nagpur had guided students on ‘Grammar rules and constructions’ (व्याकरणाचे नियम आणि निर्मिती)
Session-4 : Dr. Amruta Indurkar, Well-known writer, Nagpur had guided students on the importance of grammar in Marathi, she also guided how improve public speaking during the ‘Valedictory function’ (समारोपीय सत्र).




ग्रंथदिंडी व मराठी साहित्य, संस्कृती दर्शन सोहळा

27/01/2023



मराठी भाषा गौरवदिन सोहळा

विषय : मराठी भाषा आणि कुसुमाग्रजांची कविता
27th Feb 2023 at 10.00 am
The Department of Marathi had organized मराठी भाषा गौरवदिन सोहळा On the theme मराठी भाषा आणि कुसुमाग्रजांची कविता on dated 27th February, 2023 at Vimlatai Deshmukh Sabhagruha.
Dr. Rajendra Watane, Head of the Department, Taywade College, Koradi, Dist. Nagpur guided students on the contribution of poems of V. W. Shirwadkar alias Kusumagraj in the Marathi language.
Dr. Bharti Khapekar, Officiating Principal, Professor & Head, Department of Marathi had organized the program and presided over the function. She delivered the presidential speech during the program.


जागतिक महिलादिना निमित्त व्याख्यान "स्त्रीपुरुष समानता आणि महिला सक्षमीकरण"

08/03/2023
The Department of Marathi in collaboration with Women Cell & Task Force Committee had organized program on “Gender Equality and Women Empowerment” on the occasion of World Women Day on 8th March, 2023.
Adv Rekha Barahate, Ex. Member, Commission for Protection of Child Rights and Ex. Corporator guided the students about the importance of gender equality and women empowerment.



2023-24

१. मराठी भाषा, व्याकरण व साहित्य - अल्पकालीन अभ्यासक्रम (सर्टिफिकेट कोर्स)
मराठी विभागातर्फे दिनांक ९ ऑक्टोबर २०२३ रोजी अल्पकालीन अभ्यासक्रम सुरु करण्यात आला. ह्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या उपप्राचार्या व मराठी विभाग प्रमुख डॉ.भारती खापेकर मॅडम यांनी भूषविले. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या जवाहरलाल नेहरू महाविद्यालय वाडी येथील मराठी विभाग प्रमुख डॉ. कल्पना बोरकर मॅडम होत्या.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.विभा क्षीरसागर, सी. पी. अँड बेरार महाविद्यालय, नागपूर यांनी ' नाट्यलेखन ' कसे करावे हे अतिशय सुंदर, सरळ आणि सुबोध भाषेत हसत खेळत समजावून सांगितले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉ. कल्पना बोरकर यांनी अतिशय सुंदर पद्धतीने मराठी व्याकरण व ग्रामीण नाट्यलेखनाबद्दल विस्तृत असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. डॉ.भारती खापेकर मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना साहित्य कसे असायला हवे याविषयी परिपूर्ण माहिती दिली तसेच व्याकरणाचे अनेक नियम सांगितले.
५ दिवस चाललेल्या कार्यक्रमाची सांगता प्रा. नितीन कराळे यांच्या "प्रसार माध्यमे आणि मराठी साहित्य" या व्याख्यानाने झाली. प्रा.नितीन कराळे यांनी प्रसारमाध्यमे आणि रोजगाराच्या विविध संधी या बद्दल विस्तृत माहिती दिली. समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ पद्मिनी दुरूगकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. मयुरी ठाकरे यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन डॉ. सीमा बेहेरे यांनी केले.
या १५ दिवसीय मराठी भाषा, व्याकरण व साहित्य प्रमाणपत्र अभ्यासक्रमात महानुभाव साहित्य आणि मराठी साहित्य, मराठी साहित्य व पर्यावरण, मराठी भाषा व बोलीभाषा व व्याकरण, प्रतिभा इंगोले यांच्या कथा व साहित्य अशा विविध विषयांवर विविध मान्यवरांची व्याख्याने आयोजित करून चर्चा करण्यात आली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
डॉ. प्रणाली म्हात्रे, डॉ पद्मिनी दुरूगकर, डॉ सीमा बेहेरे, प्रा. मयुरी ठाकरे यांनी संपूर्ण अभ्यासक्रमाची व्यवस्था सांभाळली.



२. एक दिवसीय विद्यापीठ स्तरीय चर्चासत्र - २८ ऑक्टोबर २०२३

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली मराठी प्राध्यापक परिषद, तायवाडे महाविद्यालय कोराडी, धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २८ ऑक्टोबर २०२३ रोजी एक दिवस विद्यापीठ स्तरीय "राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि मराठीचा अभ्यासक्रम" या विषयावर धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी प्राध्यापक परिषदेचे अध्यक्ष डॉ. गणेश मोहोड, उद्घाटक म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे अधिष्ठाता डॉ संजय कवीश्वर प्रमुख अतिथी म्हणून धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. ओंम राज देशमुख, तायवाडे महाविद्यालय कोराडीच्या प्राचार्या डॉक्टर शरयू तायवाडे, मराठी प्राध्यापक परिषदेचे, सचिव डॉ राजेंद्र वाटाणे, धनवटे नॅशनल कॉलेजच्या मराठी विभाग प्रमुख डॉ.भारती खापेकर ह्या उपस्थित होते. या चर्चासत्रात पहिल्या सत्रात "पदवी पातळीवरील मराठीचा अभ्यासक्रम" तर दुसऱ्या विद्यापीठ स्तरीय सत्रात " पदव्युत्तर पातळीवरील मराठीचा अभ्यासक्रम" या विषयांवर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाला विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


३. डॉ.भारती खापेकर यांच्या 'प्राजक्त' काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन 20/09/2023

धनवटे नॅशनल कॉलेजच्या उपप्राचार्य आणि मराठी विभाग प्रमुख डॉ. भारती खापेकर यांच्या 'प्राजक्त' या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा विदर्भ साहित्य संघाच्या 'अमेय' दालनात संपन्न झाला.
अक्षरक्रांती फाउंडेशनचे अध्यक्ष व कवी मा. शंकर घोरसे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी सुप्रसिद्ध कवी, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.वासुदेव डहाके अध्यक्षस्थानी होते, सुप्रसिद्ध कवी व समीक्षक मा. प्रभाकर तांडेकर 'प्रदत्त', धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. ओमराज देशमुख, सुप्रसिद्ध साहित्यिक आणि समीक्षक डॉ. राजेंद्र वाटाणे या मान्यवरांच्या शुभहस्ते 'प्राजक्त' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. अक्षरक्रांती फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय शंकर घोरसे या प्रसंगी म्हणाले 'प्राजक्त' या कवितासंग्रहातील कवितांमधून निसर्ग आणि त्यातील रूपके दिसून येतात तसेच या कवितासंग्रहातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यावरील कविता व गांधीजींवरील कविता उल्लेखनीय आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध कवी व समीक्षक प्रभाकर तांडेकर 'प्रदत्त' म्हणाले, प्राजक्त कवितासंग्रह सत्य, शिव, सौंदर्य, सत्त्व, सुगुण या गुणांनी परिपूर्ण असून समाजाचे सूक्ष्मचिंतन व सखोल परीक्षण डॉ. भारती खापेकर यांच्या कवितेतून दिसून येते. तर धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. ओमराज देशमुख म्हणाले की, डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची 125 वी जयंती आहे. त्यानिमित्त शतकोत्तर रोप्य महोत्सव श्री शिवाजी शिक्षण संस्था साजरा करीत आहे. डॉक्टर भारती खापेकर यांचा 'प्राजक्त' काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. यानिमित्ताने भाऊसाहेबांचे विचार साहित्याच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवावे; अशी अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
प्राजक्त' या काव्यसंग्रहावर डॉ.राजेंद्र वाटाणे यांनी सखोल भाष्य केले. ते म्हणाले, यांच्या कविता समाजभान जपणाऱ्या आहेत. कवयित्री डॉ. भारती खापेकर यांनी मनोगत व्यक्त केले; त्या म्हणाल्या, माणसामधला माणूस समजून घेताना माणसाचे माणसाशी असलेले नाते या नात्यातून निर्माण होणारा भावबंध कवितेतून साकार करण्याचे धाडस केले आहे. याप्रसंगी रोशनी गतफणे, मंगला लांडे, दिपाली खोबरखेडे यांनी विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. वासुदेव डहाके म्हणाले, कवयित्रीचे सामाजिक भान जागृत असल्याने तिला बदलत्या वातावरणात घडणाऱ्या घडामोडींची जाण आहे . ती जाणीव त्यांच्या कवितेत उमटली आहे. समकालीन कवितेला स्पर्श करीत त्यांच्या कविता उमललेल्या आहेत. कवयित्रीला पुढील साहित्य निर्मितीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.पद्मिनी घोसेकर यांनी केले. आभार प्रा.मयुरी ठाकरे यांनी मानले. या कार्यक्रमाला धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राध्यापक., शिक्षकेतर कर्मचारी,आणि साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर व श्रोते उपस्थित होते.


४. स्वलिखित काव्यवाचन स्पर्धा

अरुणोदय बहुउद्देशीय संस्था व मराठी विभाग धनवटे नॅशनल कॉलेज संयुक्त विद्यमाने स्वर्गीय अरुणा पवार - चवरे स्मृती स्वलिखित काव्यवाचन स्पर्धा - २०२३ दिनांक ११ डिसेम्बर, २०२३ रोजी आयोजित करण्यात आला. या काव्यवाचन स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हा कार्यक्रम डॉ भारती खापेकर, मराठी विभाग प्रमुख, श्री श्याम बोकाडे तसेच सौ. वैदेही चवरे यांनी आयोजित केला.


५. आकाशवाणी, नागपूर वर व्याख्यान

धनवटे नॅशनल कॉलेज मराठी विभागातील प्राध्यापिका डॉ. पद्मिनी दुरूगकर घोसेकर तसेच कु. मयुरी ठाकरे यांचे नागपूर आकाशवाणीवर व्याख्यान प्रसारित झाले


६. पारितोषिक

सिनेआर्क प्रॉडक्शनस् प्रा. लि. मुंबई या संस्थतर्फे प्रा. मयुरी ठाकरे यांना साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी महाराष्ट्र रत्न - 2023 हा पुरस्कार जाहीर झाला.